मंगळवार, १० मार्च, २०१५

फेअरनेस क्रिम खरेदी करतांना या ३ गोष्टींची घ्या काळजी!

फेअरनेस क्रिम खरेदी करतांना या ३ गोष्टींची घ्या  काळजी!

 'फक्त सात दिवसात गोरेपणा मिळवा' असा गोरेपणाचा दावा करणाऱ्या खूप साऱ्या फेअरनेस क्रिमच्या कंपन्या आहेत. पण असा दावा करणाऱ्या किती कंपन्या खरंच त्यांच्या या दाव्याला खऱ्या उतरतात.
फेअरनेस क्रिमबाबतीत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. फेअरनेस क्रिमच्या कोणत्या घटकानं त्वचा उजळली जाते किंवा त्यात काय घटक असतात.लेबलवर छापल्या जाण्याऱ्या गोष्टींमुळं तुम्हाला कळू शकतं की कोणती फेअरनेस क्रिम चांगली आहे आणि तुमच्यासाठी योग्य आहे. योग्य फेअरनेस क्रिम ओळखण्यासाठी तुम्हाला या ३ गोष्टींची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.
१. अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड
अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड त्वचेचा रंग उजळवण्यास खूप मदत करतात. उसात आढळण्याऱ्या या पदार्थाच्या तत्वाचा उपयोग काही आयुर्वेदिक कंपन्या देखील करतात. एएचएमध्ये मुख्यत: दोन प्रकारचे अॅसिड असतात. लॅक्टिक अॅसिड आणि गायक्लॉनिक अॅसिड. कोणत्याही फेअरनेस क्रिममध्ये या दोन गोष्टी असणे अत्यंत आवश्यक असतं.
२.व्हिटॅमिन 'अ'च्या संबधित असणारे तत्व
व्हिटॅमिन 'अ'पासून बनवल्या जाणाऱ्या रेटिनोल, रेटिनलडीहाइड आणि रेटिनल पामिटेट सारखे तत्व त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करतात. हे त्वचेत कोलेजनचं प्रमाण वाढवतात ज्यानं त्वचा निरोगी होते.
३. व्हिटॅमिन 'सी'च्या संबधित असणारे तत्व
व्हिटॅमिन 'सी'मध्ये अल्ट्रा पोंटेंट अँटीऑक्सिडेंट्स त्वचेला उजळ करतात आणि त्वचेवरील डाग दूर करतात. कोणत्याही फेअरनेस क्रिममध्ये १० टक्के व्हिटॅमिन 'सी' असणं आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा