बुधवार, २२ एप्रिल, २०१५

घरच्या घरी मिळवा गोरी आणि तजेलदार त्वचा...


 

 घरच्या घरी मिळवा गोरी आणि तजेलदार त्वचा...

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही मिळवू शकता गोरी त्वचा.... यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता. 
पाहा, काही साधे आणि सोप्पे उपाय...
बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावावी. फरक तुम्हाला दिसेल. 
त्याप्रमाणे पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 
त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे. 
अॅलोव्हेरा जेलचा म्हणजेच कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे. 
तसेच सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.
आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.
साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल. 
नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल. 
पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.

रविवार, १९ एप्रिल, २०१५

कैरीचे लोणचे

 

कैरीचे चटपटीत लोणचे
  साहित्य : कैर्‍या कडक व आंबट अर्धा किलो, तेल १ वाटी, मोहरीची डाळ अर्धी वाटी, तिखट अर्धी वाटी, मीठ अर्धी वाटी, मेथीची पावडर अर्धा चमचा, बडीशेप १ चमचा, हळद पाव वाटी, हिंग पावडर १ चमचा इ.
  lonach.png

    कृती : कैऱ्या धुऊन-पुसून फोडी करून घ्याव्या. कढईत तेल धूर निघेपर्यंत गरम करावे. खाली उतरवून त्यात मोहरी दाणे घालून तडतडू द्यावे. नंतर त्यात हिंग, हळद, मेथी पावडर, बडीशेप, मोहरीची डाळ, मीठ घालून हलवावे. जरा थंड झाल्यावर शेवटी तिखट घालावे. छान हलवून मसाला थंड होऊ द्यावा. मसाला पूर्णपणे गार झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी मिसळून लोणचे बरणीत भरून ठेवावे. सहा महिने लोणचे टिकेल.

    टीप : लोणच्यात टाकावयाचे मीठ रवाळ भाजून थंड करून घालावे. म्हणजे लोणचे खमंग होते. मोहरीची डाळ जरा गरम करून वाटून घ्यावी म्हणजे मसाला लोणच्याला चिकटून राहतो व लोणचे लवकर मुरते. तिखट लालभडक असावे. हे लालभडक चटपटीत लोणचे तुमची रसना नक्कीच तृप्त करेल.

संबंधित रेसेपी


ताजंतवानं दिसण्यासाठी

ताजंतवानं दिसण्यासाठी

ताजंतवानं साठी प्रतिमा परिणाम

आजच्या जगात दररोज सतत ताजंतवानं दिसणं फार गरजेचं आहे. ऑफिस असो की घर, आपलं व्यक्तिमत्त्व खुलून दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. पण या धकाधकीच्या जीवनात अगदी रोज ताजंतवानं

दिसण्यासाठी चेहर्‍यावर मेक-अप थापायला हवा, असा तुमचा समज असेल तर तो बाजूला ठेवायला हवा. कारण जीवनशैलीतल्या अगदी साध्या बदलांनी आणि काही उपायाने तुम्ही दररोज ताजेपणाचा अनुभव घेऊ शकता.

* रोज स्वच्छ अंघोळ करा. नियमितपणे केस धुवा आणि चेहरा धुण्यासाठी चांगल्या क्लिंजर किंवा फेसवॉशचा वापर करा.
* केस नियमितपणे ट्रिम करून घ्या. यामुळे ते दिसतीलही छान आणि केसांची वाढही झपाट्याने होईल.
* मेक-अप करायचा असेल तर लाइट आणि नैसर्गिक शेड्सचा वापर करा.
* दिवसा सनस्क्रीन लावूनच घराबाहेर पडा. कोणताही मौसम असला तरी सनस्क्रीन टाळू नका.
* ताजी फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा. नियमितपणे फळं आणि भाज्या खा. भरपूर पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातील आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळेल.
* कायम हसत राहा. आनंदी, उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूड चांगला राहील. तुमच्या चांगल्या मूडचं प्रतिबिंब चेहर्‍यावर पडल्याशिवाय राहणार नाही.
* रात्री शांत आणि भरपूर झोप घ्या. कारण चांगल्या झोपेमुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. झोप नीट झाली नाही तर चिडचिड होते. तुम्ही कितीही महागडे उपाय केले, महागड्या स्पामध्ये गेलात तरीही अपुर्‍या झोपेमुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसणार नाही. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको.


आरती देशपांडे

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

कच्छी दाबेली

कच्छी दाबेली

साहित्य:

भाजीसाठी-  २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, १ मध्यम टोमॅटो, १ टीस्पून पावभाजी मसाला, १ १/२ टीस्पून धणेपूड, ३/४ टीस्पून जिरेपूड ,१ टीस्पून लाल तिखट १ १/२, टीस्पून लसूण पेस्ट  १/४ टीस्पून, गरम मसाला,  मीठ चवीप्रमाणे,  २ ते ३ टेबलस्पून तेल.

वरून पेरण्यासाठी- मुठभर तिखट शेंगदाणे (घरी बनवण्यासाठी दाण्यांना थोडं तेल, मीठ आणि तिखट चोळून मग दाणे भाजून घ्या.)  १/२ कप डाळिंबाचे दाणे  ५-६ द्राक्षं तुकडे करून १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची तिखट चटणी  चिंचेची गोड चटणी  १ कप बारीक शेव  १/२ कप बारीक चिरलेला कांदा १०-१२ लादी पाव (पावभाजीचे पाव) पाव भाजण्यासाठी बटर

कृती:

१. बटाटे उकडून त्याची साले काढा. बटाटे गार झाल्यावर हाताने छान कुस्करून घ्या. कढईत तेल गरम करा आणि लसणीची पेस्ट घाला. खमंग वास आला कि लगेच कांदा घालून परता.

२. कांदा शिजला कि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता. हळद, तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्या. नंतर कुस्करलेला बटाटा घालून परता. सगळ्या छान मिक्स करून घ्या. आता तुमची भाजी तयार झाली.

३. एका थाळीत किंवा पसरत भांड्यात हि भाजी घालून चपटी करून घ्या. त्यावर तिखट शेंगदाणे,डाळिंबाचे दाणे,चिरलेली द्राक्षे आणि कोथिंबीर घालून सजवा.माझ्याकडे डाळिंबाचे दाणे नव्हते म्हणून मी फक्त द्राक्ष वापरली होती. तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तर नक्की वापरा त्यामुळे दाबेली जास्ती छान लागते

४. लादी पावाला सुरीने मधोमध चीर द्या. पाव पूर्ण उघडेल इतपतच चीर द्या. पूर्ण २ भाग होणार नाहीत याची काळजी घ्या. चमच्याने पावाला आतून पुदिन्याची तिखट चटणी लावा. नंतर चिंचेची गोड चटणी लावा.

चटण्या लावून झाल्या कि, चमचाभर भाजी घेऊन पावामध्ये पसरव. वरती थोडा कांदा,शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि १-२ द्राक्षाचे तुकडे घाला. सर्वात वर चमचाभर शेव घाला. पाव बंद करून तव्यावर दोन्ही बाजूनी भाऊन घ्या. पाव भाजताना पावाला वर खाली थोडेसे बटर लावा. गरम गरम दाबेली लगेच सर्व्ह कर

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

मासिक पाळी संदर्भातील गैरसमज......






 मासिक पाळी साठी प्रतिमा परिणाम

मासिक पाळी संदर्भातील  गैरसमज......
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे. 
1. मासिक पाळी दर 28 दिवसांनीच यायला हवी
वस्तुस्थिती: पाळीचं चक्र हे प्रत्येक महिलेच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. 20 दिवसांपासून 35 दिवसांदरम्यान कधीही मासिक पाळी येऊ शकते. पिरेड्स येण्यात काही दिवस उशीर झाला तर असं नाही की तुम्ही गर्भवती आहात. जर पाळी येण्यास थोडाच उशीर झाला असेल तर घाबरण्याची गरज नाह
2. मासिक पाळीदरम्यान सेक्स करू नये
मासिक पाळीमध्ये sex साठी प्रतिमा परिणाम
वस्तुस्थिती: अधिक जण पाळीदरम्यान आपल्या पार्टनरसोबत सेक्स करणं पसंत करत नाही. मात्र पाळी असतांना सेक्स केल्यानं आपल्याला आडकाठी / उबळपासून आराम मिळतो. संशोधकांच्या मते पाळीदरम्यान सेक्स केल्यानं वेदना कमी होतात. 
3. मासिक पाळीमध्ये गर्भवती राहू शकत नाही

मासिक पाळीमध्ये गर्भवती राहू शकत नाही साठी प्रतिमा परिणाम
वस्तुस्थिती: हा समज चुकीचा आहे. आपण मासिक पाळीदरम्यान गर्भवती राहू शकता. ज्या महिलांचं मासिक चक्र 28 दिवसांहून कमीचं असतं, त्यांच्यात पाळीदरम्यान गर्भवती होण्याची शक्यता अधिक असते. 
4. मासिक पाळीदरम्यान आंबट, तेल-मसालेयुक्त जेवण करू नये
वस्तुस्थिती: पाळीमध्ये उबळ आल्यास त्यांचा संबंध आंबट खाद्यपदार्थांसोबत अजिबात नाही. मसालेदार जेवणानं पोट खराब होऊ शकतं. पण त्याचा पाळीतील वेदनांवर काही परिणाम होत नाह
5. मासिक पाळीदरम्यान व्यायाम करू नये
वस्तुस्थिती: पाळीदरम्यान व्यायाम त्रासाला कमी करतो. कारण व्यायाम स्नायूंमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुधारतो, ज्यामुळं शरीराला आराम मिळतो. 
6. पाळीमध्ये आराम करायला हवा
वस्तुस्थिती: मासिक पाळीमध्ये शरीरातून रक्तस्त्राव होतो ज्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. एका दिवसात जवळपास चार चमचे रक्तस्त्राव होत असतो. महिला आपलं दैनिक काम आरामात करू शकतात. 
7. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम
वस्तुस्थिती: महिला यावेळी पीएमएस प्रक्रियेतून जात असतात. कारण जवळपास 85 टक्के महिला याप्रकारच्या लक्षणांचा अनुभव घेतात. 
8. पाळीतील रक्त सामान्य रक्तापेक्षा वेगळं असतं 
वस्तुस्थिती: मासिक पाळीतील रक्त हे इतर रक्तासारखं सामान्यच असतं. या काहीच असामान्य नसतं. 
9. मासिक पाळीच्या वेळी केस धुवू नये 
वस्तुस्थिती: हा गैरसमज फार पूर्वीपासून पसरला आहे. आंघोळ केल्यानं, केस धुतल्यानं रक्तस्त्राव कमजोर होतो, असा समज आहे. मात्र असं काहीच नाहीय. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आंघोळ करू शकता. 
10. कुमारीकांना कॉटनचा वापर करू नये 
वस्तुस्थिती: अनेक लोकांना वाटतं की, कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये. त्यांनी कॉटनचा वार केला तर त्यांचं कौमार्य नष्ट होतं. पण याचा काहीही संबंध नाही, असं वैज्ञानिक सांगतात.

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

महत्वाच्या किचन टिप्स :

   

महत्वाच्या किचन टिप्स :

  1. गोड व तिखट पदार्थ तळताना तेल व तूप समप्रमाणात एकत्र करून तळावेत. त्याने पदार्थ कोरडा होऊन पोटाला त्रास होत नाही.                 
  2. टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर शिळे होऊन मऊ झाले असल्यास मिठाच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावे, म्हणजे पुन्हा टवटवीत होतील.
  3. शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यात ठेवून काढावेत. भाजल्यावर खमंग व हलके होतात.    
  4. मीठदाणीत मीठ नेहमी चिटकत असते. झाकण लावण्याआधी त्यात तीन-चार दाणे तांदुळाचे टाकावे म्हणजे चिटकत नाही.
  5. आईस ट्रेमध्ये पाण्यासोबत कॉफी पावडर टाकायला पाहिजे, कारण कोल्ड कॉफीत आईस क्यूब टाकल्याने कॉफी जास्त चवदार लागते.
  6. स्वयंपाकघरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी त्यात दिवा व एग्जॉस्ट फॅन लावायला पाहिजे. त्याने आतील हवा बाहेर जाऊ शकते.   
  7. करवंदाला चीक असतो, तो जाण्याकरिता पाण्यात थोडे मीठ घालून त्यात करवंदे बुडवून ठेवावीत. चीक सुटून करवंदे स्वच्छ होतात.     
  8. पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीज अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. 'स्मार्ट वूमन' फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत
  9. साखरेच्या डब्याला हमखास मुंग्या लागतात. या डब्यात तीन-चार लवंगा ठेवा. मुंग्या साखरेपासून लांबच राहतील.
  10. मसाल्यात हिंगाचा खडा ठेवल्याने मसाला अधिक काळ टिकतो.
  11. एखाद्या पदार्थात चुकून मीठ जास्त झालं, तर साल काढलेला बटाटा त्यात टाका. अधिकचं मीठ बटाटा शोषून घेईल.
  12. नाक, तोंडावर कपडा बांधून स्वयंपाकघराची स्वच्छता केल्याने धुळीचे कण शरीरापर्यंत पोहचत नाहीत.    
  13. कुकिंग गॅसला सिरका किंवा मीठाच्या पाण्याचे साफ करावे. म्हणजे ते चमकतील आणि तिथे किडेही राहत नाही   
  14. आरसा पुसण्यासाठी एअर फ्रेशनरचा वापर करा. यामुळे आरशावरचे डाग सहज निघतील, तसंच छान सुगंधही वातावरणात पसरेल.   
   
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट