कैरीची भाजी


कैरीची भाजी


kair.png
साहित्य-
१)कैरीच्या फोडी-१/२ किलो
२)किसलेला गूळ-४ ते ५ टेबल स्पून
३)अख्खे धणे-१ टी स्पून
४)लाल तिखट-१ ते दीड टी स्पून
५)लसूण पेस्ट-१ टी स्पून
६)तमालपत्र-१
७)जिरे-मोहोरी-१ टी स्पून
८)चवीनुसार मीठ
९)गरजेनुसार तेल
१०)सजावटीसाठी कोथिंबीर
कृती-
१)सर्वात प्रथम एका भांड्यात पाणी गरम करत ठेवावे ,पाणी उकळले कि त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात व साधारण १० ते १५ मिनिट उकडू द्याव्यात .कैरीच्या फोडी नीट शिजल्या कि नाही हे बघण्यासाठी एक फोड पाण्यातून बाहेर काढून दाबून बघावी ,मऊ शिजली असेल तर आच बंद करावी व ह्या कैरीच्या फोडी एका चाळणीत    काढाव्यात व निथळत ठेवाव्यात .
२)आता एका काढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात तमालपत्र घालावे तसेच जिरे-मोहोरी घालून  चांगली तडतडू द्यावी यानंतर त्यात अख्खे धणे घालावेत यानंतर लसूण पेस्ट तसेच हळद व लाल तिखट घालून नीट परतून घ्यावे आता यात कैरीच्या उकडलेल्या फोडी घालून परतून घ्यावे .
३)कैरीच्या फोडी नीट परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे व परतून घ्यावे .आता यात किसलेला गूळ घालून नीट एकजीव करून घ्यावे .भाजीला आता थोडे पाणी सुटल्यासारखे वाटेल ,भाजी पुन्हा एकदा नीट परतून घ्यावी म्हणजे गूळ सर्व भाजीला लागेल .साधारण ५ ते ७ मिनिटात आच बंद करावी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हि भाजी तोंडलावणी म्हणून सर्व्ह करता येईल
संबंधित रेसेपी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा