शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

नववधूची तयारी




नववधूची तयारी



लग्न म्हटले की, स्वप्नाचे इमले मनात तयार होउ लागतता, पण त्याच वेळी लग्नाची तयारी करताना अनेकदा काही ना काही उणीव राहतात. आणि मग ती आयुष्यभर सलत राहते. चला तर मग नेमक्या याच उणीवा दूर करूया. नववधूसाठी आयुष्यभर लक्षात राहतील अशा काही गोष्टी.

स्पामध्ये नववधूच रंगरुप खुलविण्यासाठी ब्रायडल स्पा खूपच उत्तम पर्याय आहे. यात मॅनीक्युअर, पॅडीक्युअर, फुट मसाज, हेड मसाज देण्याबरोबरच स्काल्प मसाज, आरोमाथेरेपी, फेशियल, क्लींजिंग, डीप टिश्यू मसाज आणि हेअर क्रीम मसाजदेखील दिला जातो. लग्नाच्या कमीत कमी तीन महिने अगोदर ‍महिन्यातून दोन वेळा स्पा घ्यायला हवा.


 sari

नववधू ने आपल्या खास पेहरावांची तयारी देखील पूर्वीपासूनच करायली हवी. अलीकडे तर नववधूंसाठी वेगवेगळे डिझायनर आपापल्या कलेक्शनमध्ये ब्रायडल ड्रेसवर खास लक्ष देत आहेत. मेंदी, संगीत, लग्नाच्या रिसेप्शनासाठी डिझायनर पेहरावांची तयारी करायला हवी. पेहरावाची तयारी करताना सर्वप्रथम सध्या कोणत्या फॅब्रिकची फॅशन सुरू आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
रंगाबद्दल बोलायचे झाल्यास नववधूसाठी ऑलटाइम फेव्हरेट असलेले गडद रंग फॅशनमध्ये आहे. गडद रंगाचे लहेंगेल गरारा आणि शरारा याची जागा आता साडी आणि हलक्या लहेंग्यांनी घेतली आहे. अलीकडे तर अनारकली कुरते अधिक पसंत केले जात आहेत. आवडीनुसार शेडेड साडीवर स्टोन वर्क, लेयरवाला लहेंगा, अनारकली लहेंगा तसेच सुटवर क्रिस्टल मिरर आणि स्टोन वर्क देखील करू शकता. यामुळे कपड्याचे सौंदर्य उजळते. ब्रायडल ड्रेस थोडा वेगळा करायचा असेल, तर पैठणीबरोबरच वेगवेगळ्या राज्यातील साड्या ट्राय करू शकता. काश्मीर सिल्कच्या प्रिंटेड आणि एम्ब्रायडरी साड्या, राजस्थानी कुंदन वर्कच्या साड्या, कोटा आणि टाय अँड डाय साड्या, उत्तर प्रदेशाची बनारसी सिल्क साडी, ब्रोकेड आणि टिश्यू साड्या कोणत्याही समारंभाच उठून दिसतात तसेच पश्चिम बंगालची कॉटन, काथा, इक्तत सिल्क आणि बालापचुरी साड्या, ओरिसाची सांभलपुरी, मयूभंज, कट्टाची पट्टा, बास्काई आसामची टसर इत्यादी हातमागाच्या साड्या खुपच सुंदर दिसतात. दक्षिण भारतातील पोचमपल्ली, गुंटूर, तामिळनाडूची कांजीवरम, म्हैसूरची शिफॉन, मद्रासची कांजीवरम इत्यादी साड्याही खुलून दिसतात