रविवार, ३ मे, २०१५

स्ट्रेच मार्क्‍स कमी होण्यासाठी उपाय !


  स्ट्रेच मार्क्‍स कमी होण्यासाठी  उपाय !
गर्भाचा आकार जसजसा वाढत जातो, तसतसा पोटाच्या त्वचेवर ताण यायला लागतो. परिणामतः त्वचेवर स्ट्रेच मार्क्‍स दिसायला सुरवात होते. बरोबरच त्वचा कोरडी पडून खाजही येते; मात्र खाजवण्याने या स्ट्रेच मार्क्‍सचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता असल्याने खाज सुटली तरी त्वचेला नखे लागणार नाहीत अशी काळजी घ्यावी लागते. खाज अगदीच सहन होत नसेल, तर मऊ सुती वस्त्राने चोळता येते. त्वचेचा कोरडेपणा कमी करायला, तसेच स्ट्रेच मार्क्‍स आटोक्‍यात ठेवायला शक्‍यतो तिसऱ्या महिन्यापासूनच वर्ण्य औषधांनी सिद्ध तेल उदा. "संतुलन रोझ ब्यूटी तेल' पोट, मांड्या व नितंब या भागांवर हलक्‍या हाताने जिरवावे. यातच "सॅन मसाज पावडर' टाकून चोळल्यानेही खाज कमी होते आणि त्वचेची शिथिलताही कमी होते. सहाव्या महिन्यानंतर दिवसातून दोन-तीन वेळासुद्धा असे तेल जिरवणे चांगले. तसेच  स्ट्रेच मार्क्‍स कमीत कमी होण्यासाठी काही  पुढील उपाय सुचवला आहे,
* एरंडेल तेल आणि कोको बटर यांचं मिश्रण तयार करून स्ट्रेच मार्क असलेल्या भागावर मसाज करा. यामुळे त्वचेला ओलावा मिळून मार्क कमी व्हायला मदत होईल.
* स्ट्रेच मार्क्सवर कोरफडीचा गर लावा. 10 मिनिटे हळुवार मसाज केल्यावर त्याला वाळू द्या. साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर धुऊन टाका.
* आणि जीवास्तवाच्या कॅप्सुल्स फोडून त्यातलं औषध एकत्र करा. मार्क्सवर हे लावा. त्वचेच्या आत मुरेपर्यंत मसाज करत राहा.
* बदामाचं तेल, गव्हांकूर आणि अर्गन ऑइल याचं मिश्रण तयार करा. गरोदरपणात दिवसातून दोन वेळा याने पोटावर हळुवार मसाज करा. याने स्ट्रेच मार्क्स पडणार नाही.
* इंस्टंट मार्क्स लपवायचे असतील तर बॉडी फाउंडेशन, ब्रोंझर किंवा कन्सिलर स्ट्रेच मार्क्सवर लावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा