शनिवार, ६ जून, २०१५

केस कोरडे होण्याची कारणे


 http://lifepune.com/wp-content/uploads/2015/02/images-14.jpg


  केस कोरडे होण्याची कारणे

 केसांच्या मुळाशी असलेल्या तेल ग्रंथी अनेकदा पुरेशा कार्यक्षम नसल्याने त्या योग्य प्रमाणात सीबम तयार करू शकत नाहीत आणि केस कोरडे राहतात. साबण किंवा तीव्र शॅंपूचा अनियमित आणि अनियंत्रित वापर, यामुळेही केस, कोरडे होऊ शकतात.

तेल, कंडिंशनिंग किंवा हेअर माँइश्चरायझर न वापरता केवळ अनेकदा केस धुतल्यानेही केस कोरडे होतात. वाहनांवरून प्रवास करताना केस व्यवस्थित झाकले जातील याची काळजी घ्यायला हवी.

खूप वाऱ्याच्या संपर्कात आल्यानेही केस कोरडे आणि निस्तेज होतात. कोरड्या केसांची निगा आठवड्यातून किमान दोनदा केसांना आणि टाळूला तेल लावून हलका मसाज करावा. नारळाचे, तिळाचे किंवा खोबऱ्याचे तेल वापरण्याऐवजी कॉर्न ऑईलचा वापर करावा.

केसांना रात्री तेल लावावे व सकाळी शॅंपू करून हे तेल काढून टाकावे. शॅंपू करून झाल्यानंतर लगेच कोरड्या केसांसाठी उपयुक्त अशा कंडिशनरचा वापर करावा. कोरडे केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. थंड पाण्यात थोडे गरम पाणी घालून अर्थात कोमट अशा पाण्याने केस धुवावेत.

खास होम टिप्स


खास होम टिप्स

बरेचदा सेलोटेपचे टोक हातात सापडत नाही. अशा वेळी टेपचे बंडल फ्रीजमध्ये ठेवावे. म्हणजे त्याचे टोक सुटून वेगळे होते.

फ्लॉवरपॉटमध्ये फुले ठेवल्यानंतर पाण्यामध्ये अमोनियाचे काही थेंब टाकावे. यामुळे पाणी खराब होत नाही आणि फुलेही बराच काळ चांगली राहतात.

लाकडी शोभेच्या वस्तूंवर अधूनमधून खोबर्‍याचे तेलात बुडवलेला बोळा फिरवल्यास पुन्हा नव्यासारख्या दिसतात.

घरात अँल्युमिनियमचा पोळपाट असेल तर पोळ्या करताना सरकतो. अशा वेळी खाली ओला कपडा घातल्यास पोळपाट सरकत नाही आणि काम सोपं होतं.

भिंतीमध्ये खिळा ठोकायचा असल्यास तो गरम पाण्यात बुडवून ठेवावा. यामुळे ठोकताना सिमेंट पडत नाही आणि खिळा भिंतीत आतपर्यंत पोहोचतो

सोमवार, २५ मे, २०१५

स्कीन टॅन झालीय, डोंट वरी!

स्कीन टॅन झालीय, डोंट वरी!

प्लॅन केल्याप्रमाणे उन्हाळ्यातील सगळी मौजमजा, घुमनाफिरना झालं असेल नाही का? आणि आ‍ता तिकडून परत आल्यानंतर तिकडच्या मजा मस्तीचे फोटो पाहताना लक्षात येतं, अरे, आपण चांगलेच काळवंडलोय. उन्हात मनसोक्त भटकताना, पाण्यात खेळताना त्वचेकडे आपलं लक्षच गेलेलं नाहीय. स्कीन टॅन झालीय, पण डोंट वरी. तुमच्यासाठीच या काही खास टॅनिंग टिप्स.

1. खूप पाणी प्या. काकडीचा, कलिंगडाचा ज्यूस प्या. काकडीच्या स्लाइस डोळ्यांवर ठेवा.

2. गार दुधात कापसू बुडवून डोळ्यांवर ठेवा.

3. टॅन झालेल्या त्वचेच्या भागावर कोरफडीचा रस लावणं केव्हाही चांगलंच.

4. खायच्या डोशाचं पीठ टॅन झालेल्या भागावर लावा. ते सुकेपर्यंत ठेवा आणि मग धुवून टाका. त्वचा उजळेल.

5. कच्च्या दुधात बेसन व लिंबाचे थेंब टाकून हे मिश्रण त्वचेवर लावा. 15 मिनिटं ठेवून धुवून टाका. सतत 4 आठवडे असं केल्यास चांगला परिणाम दिसेल.

6. 1 चमचा दूध पावडर, 1 चमचा मध, 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बदामाचं तेल एकत्र करा. त्वचेवर लावून 15 मिनिटं ठेवून धुवून टाका. काळपटपणा जाऊन त्वचा चमकदार होईल. शिवाय मऊपणाही राहील. 

मंगळवार, १९ मे, २०१५

काळ्या ओठांना करा मऊ, मुलायम आणि गुलाबी,


 

काळ्या ओठांना करा मऊ, मुलायम आणि गुलाबी, या आहेत घरगुती TIPS

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे असेल तर ओठांकडे लक्ष द्यायला हवे. ओठ आकर्षक असतील तर चेहरा फार नाजूक आणि साजेसा दिसतो.
ओठांचा रंग गुलाबी असेल तर ते आकर्षक दिसतात. जर तुमच्या ओठांचा रंग काळा असेल आणि त्यांना मऊ बनवायचे असल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. याचे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत.
गुलाबी होठांसाठी TIPS
1- सर्वात आधी स्वस्त लिपस्टिक लावणे बंद करा. जर लिपस्टिकची क्वालिटी चांगली असेल तर तुमचे होठ काळे पडण्याची शक्यता असते. मऊ आणि चांगल्या होठांसाठी मॉइश्चराइज़र रिच लिपस्टिक चांगली असते.

2- बदामाचे तेल लावा

रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल होठांवर लावावे.

3- लिप बामचा करा वापर

कोरड्या होटांची काळजी वेळेवर न घेतल्याने देखील ते काळे पडण्याची शक्यता असते. पर्समध्ये नेहमी लिप बाम ठेवा. जेव्हा तुमचे होठ कोरडे पडले आहे असे वाटेल त्यावेळी लगेच तुम्ही याचा वापर करु शकता. लिप बाममध्ये नैसर्गिक बी व्हॅक्स, ग्लिसरीन, बदाम तेल आणि विटॅमिन ई युक्त ऑइल मिसळलेले असते.

4- नारळाचे तेल आणि लिंबाचा रस

शुद्ध नारळाचे तेल आणि लिंबाचा रस होठांचा रंग साफ ठेवण्यास मदत करते. उन्हात जाण्यापूर्वी होठांवर एसपीएफ-15 युक्त लिप बाम लावावा. यामुळे होठ काळे पडत नाही
5- डाळिंब, लाल द्राक्षांचा रस
डाळिंब, लाल द्राक्ष यांचा रस होठांवर लावल्यास होठांचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.

6- गुणकारी लिंबू आणि मध

लिंबू आणि मध होठांना लावल्यास फायदा होतो.

7- चहा, कॉफी जास्त घेऊ नका

जास्त चहा आणि कॉफीचे सेवन करु नये. कॉफीमध्ये कोफीन असल्याने होठाचा रंग काळा पडतो. डीहायड्रेशनमुळे देखील होठ कोरडे पडतात त्यामुळे होठ काळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.

8- काकडीचा रस लावा

 काकडीचा रस लावा उन्हाळ्यात त्वचा आणि होठांवर काकडीचा रस लावल्याने काळे पडलेल्या होठांचा रंग बदलण्यास मदत होते.

सोमवार, १८ मे, २०१५

मोबाइल रिंगमुळे गर्भाशयातील बाळाच्या वाढीस धोका........

 मोबाइल रिंगमुळे गर्भाशयातील बाळाच्या वाढीस धोका........

गर्भवती असलेल्या मातांनी सेलफोन वापरताना काळजी घेण्याची गरज आहे कारण या फोनची रिंग वाजते तेव्हा गर्भाशयातील बाळाचे झोपेचे व उठण्याचे चक्र पार बिघडून जाते व नंतर त्याचे वाईट परिणाम होतात, असा धोक्याचा इशारा एका संशोधनात देण्यात आला आहे. साधारण २४ महिला डॉक्टर गर्भार असताना करण्यात आलेल्या प्रयोगानुसार सेलफोनची वारंवार वाजणारी रिंग व बीपचा आवाज याचा परिणाम गर्भावर काय होतो हे तपासण्यात आले.
न्यूयॉर्क सिटी येथील वायकॉफ हाइट्स मेडिकल सेंटर येथे माता व गर्भ वैद्यक विभागाचे संचालक बोरिस पेट्रिकोव्हस्की यांनी सांगितले की, मोबाईलचा गर्भातील बाळावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्याचा आमचा हेतू होता. जर महिला गर्भार असतील व त्यांना सतत मोबाईल फोन येत असतील तर वाजणाऱ्या रिंगमुळे गर्भाशयातील बाळास घातक त्रास होतो. त्याचे झोपण्याचे व जागण्याचे चक्रच बिघडून जाते. रिंगच्या केवळ आवाजामुळेच नाही तर स्पंदनांमुळेही त्याचे झोपेचे चक्र बिघडते.
ज्या निवासी डॉक्टरांवर हे प्रयोग करण्यात आले त्यांच्यात तर खूप वाईट परिणाम दिसले. काहींचे वेळेआधीच बाळंतपण झाले तर काहींचा रक्तदाबाचा त्रास वाढला, काही मुलांचे वजन जन्मत: कमी निघाले. असे असले तरी मोबाईलच्या आवाजामुळेच हे सगळे परिणाम होत असावेत याची अजून खातरजमा करण्यात आली नाही.
रहिवासी महिला डॉक्टर नेहमी फोन बाळगत असतात व बराच काळ तो अगदी जवळ ठेवलेला असतो. एक मात्र खरे की मोबाईलच्या रिंग सतत वाजत राहिल्या तर गर्भाचे वर्तन बिघडते. त्यात व्यत्यय निर्माण होतो. एकूण २८ बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ महिलांचा गर्भारपणात अभ्यास करण्यात आला त्यात मोबाईल फोन गर्भाच्या डोक्याजवळ ठेवण्यात आला होता व साधारण पाच मिनिटांनी िरग देण्यात आली. नंतर या महिलांची अल्ट्रासाउंड तपासणी करण्यात आली. सर्व गर्भ २७ ते ४१ आठवडय़ांचे होते. त्यांच्यात डोके वळणे, तोंड उघडे राहणे, थरथरणे असे परिणाम दिसले, जेव्हा दर दहा मिनिटाला रिंग देण्यात आली तेव्हा गर्भावर वाईट परिणाम दिसून आले, असे हेल्थ डे च्या बातमीत म्हटले आहे.
संशोधकांच्या मते काही गर्भाना नंतर त्या आवाजाची सवय होऊन जाते. जेव्हा फोनची रिंग सतत दहा मिनिटे वाजते तेव्हा गर्भ थरथरण्याचे प्रमाण कमी होते, त्यात ३६ आठवडय़ांच्या ६० टक्के गर्भाचा समावेश होता. मोबाईल जवळ ठेवला व त्याची रिंग वाजत राहिली तर त्यामुळे गर्भाचे नेहमीचे वर्तन मात्र बिघडते यात शंका नाही.

फ्रीजमधील वजन वाढवणारे पदार्थ खाणे टाळा

फ्रीजमधील वजन वाढवणारे पदार्थ खाणे टाळा
तुमच्या फ्रिजमध्ये अनेक असे पदार्थ असतात, ते खाल्ल्याने वजन वाढत असते. व्यायामाबरोबरच फ्रिज स्वच्छ केले पाहिजे. कारण आपल्याला टोन्ड बॉडी मिळू शकेल. खाली अशाच चरबी वाढवणाऱ्या अन्नपदार्थांची माहिती देण्यात आली आहे. 
रेडी टू मेक फूड

Image result for रेडी टू मेक फूडImage result for रेडी टू मेक फूड

पाकीटउघडल्याने लवकर बनणारे रेडी टू इट फूडमध्ये भरपूर प्रमाणात चरबी असते. हे पदार्थ बनवायला कमी वेळ लागत असेल, पण या पदार्थांमुळे वजन लवकर वाढते. हे पदार्थही फ्रिजच्या बाहेर काढा.

मारगराईन (कृत्रिम लोणी )

Image result for margarine
अनेकलोक लोण्याच्या जागी मारगराईनचा वापर करतात. ते वापरायला नको. कारण हा पदार्थ लोण्यासारखा स्वादिष्ट नाही, आरोग्यासाठीही चांगला नाही. त्यापेक्षा लोणीच चांगला पर्याय आहे. मात्र, लोणी कमी प्रमाणात घ्यावे.

मंगळवार, १२ मे, २०१५

ब्रेड रोल्स

 ब्रेड रोल्स

साहित्य: स्लाईस ब्रेड, उकडलेले बटाटे, मीठ,हिरव्या मिरच्या, कोथिंबीर थोडे आले,

कृती : ब्रेडच्या कड्या कापून घ्या. ऊकड्लेले बटाटे सोलून घ्या. नंतर किसणीवर किसा. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालून सारण तयार करावे. उथळ पातेलीत पाणी घेवून त्यात एकेक स्लाईस टाकाव्यात. नंतर दोन्ही हाताच्या तळव्याने दाबून पाणी काढून टाकावे. त्यावर सारण घालून गुंडाळी करावी. कडा बंद कराव्यात. ब्रेड ओला झाल्यामुळे छान गुंडाळी होते. नंतर तव्यात तूप टाकून त्यात हे रोल्स तळून काढावेत. छान कुरकुरीत होतात.

हे गरमागरम रोल्स सॉस/चिंचचटणी  सोबत सर्व्ह करावेत.

रविवार, ३ मे, २०१५

स्ट्रेच मार्क्‍स कमी होण्यासाठी उपाय !


  स्ट्रेच मार्क्‍स कमी होण्यासाठी  उपाय !
गर्भाचा आकार जसजसा वाढत जातो, तसतसा पोटाच्या त्वचेवर ताण यायला लागतो. परिणामतः त्वचेवर स्ट्रेच मार्क्‍स दिसायला सुरवात होते. बरोबरच त्वचा कोरडी पडून खाजही येते; मात्र खाजवण्याने या स्ट्रेच मार्क्‍सचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता असल्याने खाज सुटली तरी त्वचेला नखे लागणार नाहीत अशी काळजी घ्यावी लागते. खाज अगदीच सहन होत नसेल, तर मऊ सुती वस्त्राने चोळता येते. त्वचेचा कोरडेपणा कमी करायला, तसेच स्ट्रेच मार्क्‍स आटोक्‍यात ठेवायला शक्‍यतो तिसऱ्या महिन्यापासूनच वर्ण्य औषधांनी सिद्ध तेल उदा. "संतुलन रोझ ब्यूटी तेल' पोट, मांड्या व नितंब या भागांवर हलक्‍या हाताने जिरवावे. यातच "सॅन मसाज पावडर' टाकून चोळल्यानेही खाज कमी होते आणि त्वचेची शिथिलताही कमी होते. सहाव्या महिन्यानंतर दिवसातून दोन-तीन वेळासुद्धा असे तेल जिरवणे चांगले. तसेच  स्ट्रेच मार्क्‍स कमीत कमी होण्यासाठी काही  पुढील उपाय सुचवला आहे,
* एरंडेल तेल आणि कोको बटर यांचं मिश्रण तयार करून स्ट्रेच मार्क असलेल्या भागावर मसाज करा. यामुळे त्वचेला ओलावा मिळून मार्क कमी व्हायला मदत होईल.
* स्ट्रेच मार्क्सवर कोरफडीचा गर लावा. 10 मिनिटे हळुवार मसाज केल्यावर त्याला वाळू द्या. साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर धुऊन टाका.
* आणि जीवास्तवाच्या कॅप्सुल्स फोडून त्यातलं औषध एकत्र करा. मार्क्सवर हे लावा. त्वचेच्या आत मुरेपर्यंत मसाज करत राहा.
* बदामाचं तेल, गव्हांकूर आणि अर्गन ऑइल याचं मिश्रण तयार करा. गरोदरपणात दिवसातून दोन वेळा याने पोटावर हळुवार मसाज करा. याने स्ट्रेच मार्क्स पडणार नाही.
* इंस्टंट मार्क्स लपवायचे असतील तर बॉडी फाउंडेशन, ब्रोंझर किंवा कन्सिलर स्ट्रेच मार्क्सवर लावा.


बुधवार, २२ एप्रिल, २०१५

घरच्या घरी मिळवा गोरी आणि तजेलदार त्वचा...


 

 घरच्या घरी मिळवा गोरी आणि तजेलदार त्वचा...

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही मिळवू शकता गोरी त्वचा.... यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता. 
पाहा, काही साधे आणि सोप्पे उपाय...
बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावावी. फरक तुम्हाला दिसेल. 
त्याप्रमाणे पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 
त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे. 
अॅलोव्हेरा जेलचा म्हणजेच कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे. 
तसेच सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.
आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.
साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल. 
नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल. 
पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवावी. त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळेल.

रविवार, १९ एप्रिल, २०१५

कैरीचे लोणचे

 

कैरीचे चटपटीत लोणचे
  साहित्य : कैर्‍या कडक व आंबट अर्धा किलो, तेल १ वाटी, मोहरीची डाळ अर्धी वाटी, तिखट अर्धी वाटी, मीठ अर्धी वाटी, मेथीची पावडर अर्धा चमचा, बडीशेप १ चमचा, हळद पाव वाटी, हिंग पावडर १ चमचा इ.
  lonach.png

    कृती : कैऱ्या धुऊन-पुसून फोडी करून घ्याव्या. कढईत तेल धूर निघेपर्यंत गरम करावे. खाली उतरवून त्यात मोहरी दाणे घालून तडतडू द्यावे. नंतर त्यात हिंग, हळद, मेथी पावडर, बडीशेप, मोहरीची डाळ, मीठ घालून हलवावे. जरा थंड झाल्यावर शेवटी तिखट घालावे. छान हलवून मसाला थंड होऊ द्यावा. मसाला पूर्णपणे गार झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी मिसळून लोणचे बरणीत भरून ठेवावे. सहा महिने लोणचे टिकेल.

    टीप : लोणच्यात टाकावयाचे मीठ रवाळ भाजून थंड करून घालावे. म्हणजे लोणचे खमंग होते. मोहरीची डाळ जरा गरम करून वाटून घ्यावी म्हणजे मसाला लोणच्याला चिकटून राहतो व लोणचे लवकर मुरते. तिखट लालभडक असावे. हे लालभडक चटपटीत लोणचे तुमची रसना नक्कीच तृप्त करेल.

संबंधित रेसेपी


ताजंतवानं दिसण्यासाठी

ताजंतवानं दिसण्यासाठी

ताजंतवानं साठी प्रतिमा परिणाम

आजच्या जगात दररोज सतत ताजंतवानं दिसणं फार गरजेचं आहे. ऑफिस असो की घर, आपलं व्यक्तिमत्त्व खुलून दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. पण या धकाधकीच्या जीवनात अगदी रोज ताजंतवानं

दिसण्यासाठी चेहर्‍यावर मेक-अप थापायला हवा, असा तुमचा समज असेल तर तो बाजूला ठेवायला हवा. कारण जीवनशैलीतल्या अगदी साध्या बदलांनी आणि काही उपायाने तुम्ही दररोज ताजेपणाचा अनुभव घेऊ शकता.

* रोज स्वच्छ अंघोळ करा. नियमितपणे केस धुवा आणि चेहरा धुण्यासाठी चांगल्या क्लिंजर किंवा फेसवॉशचा वापर करा.
* केस नियमितपणे ट्रिम करून घ्या. यामुळे ते दिसतीलही छान आणि केसांची वाढही झपाट्याने होईल.
* मेक-अप करायचा असेल तर लाइट आणि नैसर्गिक शेड्सचा वापर करा.
* दिवसा सनस्क्रीन लावूनच घराबाहेर पडा. कोणताही मौसम असला तरी सनस्क्रीन टाळू नका.
* ताजी फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा. नियमितपणे फळं आणि भाज्या खा. भरपूर पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातील आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळेल.
* कायम हसत राहा. आनंदी, उत्साही राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूड चांगला राहील. तुमच्या चांगल्या मूडचं प्रतिबिंब चेहर्‍यावर पडल्याशिवाय राहणार नाही.
* रात्री शांत आणि भरपूर झोप घ्या. कारण चांगल्या झोपेमुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता. झोप नीट झाली नाही तर चिडचिड होते. तुम्ही कितीही महागडे उपाय केले, महागड्या स्पामध्ये गेलात तरीही अपुर्‍या झोपेमुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसणार नाही. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको.


आरती देशपांडे

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

कच्छी दाबेली

कच्छी दाबेली

साहित्य:

भाजीसाठी-  २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, १ मध्यम टोमॅटो, १ टीस्पून पावभाजी मसाला, १ १/२ टीस्पून धणेपूड, ३/४ टीस्पून जिरेपूड ,१ टीस्पून लाल तिखट १ १/२, टीस्पून लसूण पेस्ट  १/४ टीस्पून, गरम मसाला,  मीठ चवीप्रमाणे,  २ ते ३ टेबलस्पून तेल.

वरून पेरण्यासाठी- मुठभर तिखट शेंगदाणे (घरी बनवण्यासाठी दाण्यांना थोडं तेल, मीठ आणि तिखट चोळून मग दाणे भाजून घ्या.)  १/२ कप डाळिंबाचे दाणे  ५-६ द्राक्षं तुकडे करून १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची तिखट चटणी  चिंचेची गोड चटणी  १ कप बारीक शेव  १/२ कप बारीक चिरलेला कांदा १०-१२ लादी पाव (पावभाजीचे पाव) पाव भाजण्यासाठी बटर

कृती:

१. बटाटे उकडून त्याची साले काढा. बटाटे गार झाल्यावर हाताने छान कुस्करून घ्या. कढईत तेल गरम करा आणि लसणीची पेस्ट घाला. खमंग वास आला कि लगेच कांदा घालून परता.

२. कांदा शिजला कि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता. हळद, तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्या. नंतर कुस्करलेला बटाटा घालून परता. सगळ्या छान मिक्स करून घ्या. आता तुमची भाजी तयार झाली.

३. एका थाळीत किंवा पसरत भांड्यात हि भाजी घालून चपटी करून घ्या. त्यावर तिखट शेंगदाणे,डाळिंबाचे दाणे,चिरलेली द्राक्षे आणि कोथिंबीर घालून सजवा.माझ्याकडे डाळिंबाचे दाणे नव्हते म्हणून मी फक्त द्राक्ष वापरली होती. तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तर नक्की वापरा त्यामुळे दाबेली जास्ती छान लागते

४. लादी पावाला सुरीने मधोमध चीर द्या. पाव पूर्ण उघडेल इतपतच चीर द्या. पूर्ण २ भाग होणार नाहीत याची काळजी घ्या. चमच्याने पावाला आतून पुदिन्याची तिखट चटणी लावा. नंतर चिंचेची गोड चटणी लावा.

चटण्या लावून झाल्या कि, चमचाभर भाजी घेऊन पावामध्ये पसरव. वरती थोडा कांदा,शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि १-२ द्राक्षाचे तुकडे घाला. सर्वात वर चमचाभर शेव घाला. पाव बंद करून तव्यावर दोन्ही बाजूनी भाऊन घ्या. पाव भाजताना पावाला वर खाली थोडेसे बटर लावा. गरम गरम दाबेली लगेच सर्व्ह कर

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

मासिक पाळी संदर्भातील गैरसमज......






 मासिक पाळी साठी प्रतिमा परिणाम

मासिक पाळी संदर्भातील  गैरसमज......
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे. 
1. मासिक पाळी दर 28 दिवसांनीच यायला हवी
वस्तुस्थिती: पाळीचं चक्र हे प्रत्येक महिलेच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. 20 दिवसांपासून 35 दिवसांदरम्यान कधीही मासिक पाळी येऊ शकते. पिरेड्स येण्यात काही दिवस उशीर झाला तर असं नाही की तुम्ही गर्भवती आहात. जर पाळी येण्यास थोडाच उशीर झाला असेल तर घाबरण्याची गरज नाह
2. मासिक पाळीदरम्यान सेक्स करू नये
मासिक पाळीमध्ये sex साठी प्रतिमा परिणाम
वस्तुस्थिती: अधिक जण पाळीदरम्यान आपल्या पार्टनरसोबत सेक्स करणं पसंत करत नाही. मात्र पाळी असतांना सेक्स केल्यानं आपल्याला आडकाठी / उबळपासून आराम मिळतो. संशोधकांच्या मते पाळीदरम्यान सेक्स केल्यानं वेदना कमी होतात. 
3. मासिक पाळीमध्ये गर्भवती राहू शकत नाही

मासिक पाळीमध्ये गर्भवती राहू शकत नाही साठी प्रतिमा परिणाम
वस्तुस्थिती: हा समज चुकीचा आहे. आपण मासिक पाळीदरम्यान गर्भवती राहू शकता. ज्या महिलांचं मासिक चक्र 28 दिवसांहून कमीचं असतं, त्यांच्यात पाळीदरम्यान गर्भवती होण्याची शक्यता अधिक असते. 
4. मासिक पाळीदरम्यान आंबट, तेल-मसालेयुक्त जेवण करू नये
वस्तुस्थिती: पाळीमध्ये उबळ आल्यास त्यांचा संबंध आंबट खाद्यपदार्थांसोबत अजिबात नाही. मसालेदार जेवणानं पोट खराब होऊ शकतं. पण त्याचा पाळीतील वेदनांवर काही परिणाम होत नाह
5. मासिक पाळीदरम्यान व्यायाम करू नये
वस्तुस्थिती: पाळीदरम्यान व्यायाम त्रासाला कमी करतो. कारण व्यायाम स्नायूंमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुधारतो, ज्यामुळं शरीराला आराम मिळतो. 
6. पाळीमध्ये आराम करायला हवा
वस्तुस्थिती: मासिक पाळीमध्ये शरीरातून रक्तस्त्राव होतो ज्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. एका दिवसात जवळपास चार चमचे रक्तस्त्राव होत असतो. महिला आपलं दैनिक काम आरामात करू शकतात. 
7. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम
वस्तुस्थिती: महिला यावेळी पीएमएस प्रक्रियेतून जात असतात. कारण जवळपास 85 टक्के महिला याप्रकारच्या लक्षणांचा अनुभव घेतात. 
8. पाळीतील रक्त सामान्य रक्तापेक्षा वेगळं असतं 
वस्तुस्थिती: मासिक पाळीतील रक्त हे इतर रक्तासारखं सामान्यच असतं. या काहीच असामान्य नसतं. 
9. मासिक पाळीच्या वेळी केस धुवू नये 
वस्तुस्थिती: हा गैरसमज फार पूर्वीपासून पसरला आहे. आंघोळ केल्यानं, केस धुतल्यानं रक्तस्त्राव कमजोर होतो, असा समज आहे. मात्र असं काहीच नाहीय. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आंघोळ करू शकता. 
10. कुमारीकांना कॉटनचा वापर करू नये 
वस्तुस्थिती: अनेक लोकांना वाटतं की, कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये. त्यांनी कॉटनचा वार केला तर त्यांचं कौमार्य नष्ट होतं. पण याचा काहीही संबंध नाही, असं वैज्ञानिक सांगतात.

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

महत्वाच्या किचन टिप्स :

   

महत्वाच्या किचन टिप्स :

  1. गोड व तिखट पदार्थ तळताना तेल व तूप समप्रमाणात एकत्र करून तळावेत. त्याने पदार्थ कोरडा होऊन पोटाला त्रास होत नाही.                 
  2. टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर शिळे होऊन मऊ झाले असल्यास मिठाच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावे, म्हणजे पुन्हा टवटवीत होतील.
  3. शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यात ठेवून काढावेत. भाजल्यावर खमंग व हलके होतात.    
  4. मीठदाणीत मीठ नेहमी चिटकत असते. झाकण लावण्याआधी त्यात तीन-चार दाणे तांदुळाचे टाकावे म्हणजे चिटकत नाही.
  5. आईस ट्रेमध्ये पाण्यासोबत कॉफी पावडर टाकायला पाहिजे, कारण कोल्ड कॉफीत आईस क्यूब टाकल्याने कॉफी जास्त चवदार लागते.
  6. स्वयंपाकघरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी त्यात दिवा व एग्जॉस्ट फॅन लावायला पाहिजे. त्याने आतील हवा बाहेर जाऊ शकते.   
  7. करवंदाला चीक असतो, तो जाण्याकरिता पाण्यात थोडे मीठ घालून त्यात करवंदे बुडवून ठेवावीत. चीक सुटून करवंदे स्वच्छ होतात.     
  8. पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीज अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. 'स्मार्ट वूमन' फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत
  9. साखरेच्या डब्याला हमखास मुंग्या लागतात. या डब्यात तीन-चार लवंगा ठेवा. मुंग्या साखरेपासून लांबच राहतील.
  10. मसाल्यात हिंगाचा खडा ठेवल्याने मसाला अधिक काळ टिकतो.
  11. एखाद्या पदार्थात चुकून मीठ जास्त झालं, तर साल काढलेला बटाटा त्यात टाका. अधिकचं मीठ बटाटा शोषून घेईल.
  12. नाक, तोंडावर कपडा बांधून स्वयंपाकघराची स्वच्छता केल्याने धुळीचे कण शरीरापर्यंत पोहचत नाहीत.    
  13. कुकिंग गॅसला सिरका किंवा मीठाच्या पाण्याचे साफ करावे. म्हणजे ते चमकतील आणि तिथे किडेही राहत नाही   
  14. आरसा पुसण्यासाठी एअर फ्रेशनरचा वापर करा. यामुळे आरशावरचे डाग सहज निघतील, तसंच छान सुगंधही वातावरणात पसरेल.   
   
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवार, २३ मार्च, २०१५

पाकातल्या पुऱ्या

पाकातल्या पुर्‍या
 
साहित्य:

१ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
१ टेस्पून तेल, मोहनासाठी
चिमूटभर मिठ
दही (टीप)
पाक करण्यासाठी:- दिड कप साखर आणि १/२ ते पाऊण कप पाणी
१/२ टिस्पून वेलची पावडर
४ केशराच्या काड्या
तळण्यासाठी तूप (टीप)
 
 
कृती:

१) मैदा आणि बारीक रवा एकत्र करून १ टेस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. चिमूटभर मिठ घालावे. दही घालून घट्ट मळून घ्यावे. १ तास तसेच झाकून ठेवावे.
२) साखर आणि पाणी एकत्र करून २ तारी पाक करावा. केशर थोडे गरम करून किंचीत साखरेबरोबर कुटून पाकात घालावे. वेलची पावडर घालून मिक्स करावे.
३) जेवढी मोठी पुरी हवी असेल त्यायोग्य पुरीसाठी समान आकाराच्या लाट्या बनवाव्यात.
४) तूप गरम करून पुर्‍या तळून घ्याव्यात. पुर्‍या टिश्यु पेपरवर काढाव्यात. २-४ मिनीटांनी पाकात पुर्‍या टाकाव्यात. काही मिनीटे मुरू द्याव्यात. नंतर ताटात पाघळवत ठेवाव्यात.
सजावटीसाठी भरडसर वाटलेला पिस्ता पेरावा. या पुर्‍या पक्वान्नं म्हणून जेवणात वाढता येतात.

टीप:
१) दही वापरताना आंबट दही घ्यावे. तसेच जर दही वापरायचे नसेल तर साध्या पाण्याने पिठ भिजवावे आणि पाकामध्ये लिंबाचा रस घालावा म्हणजे गरजेचा आंबटपणा पुर्‍यांना येतो.
२) तूपाऐवजी तेलात पुर्‍या तळल्या तरी चालतात. पण तुपामुळे पुर्‍यांना खुप छान स्वाद येतो.